रणवीर अलाहाबादिया मुंबई पोलिसांसमोर हजर, दोन तास चालली चौकशी

इंडियाज गॉट टॅलेंट या शोवरील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई सायबर सेलसमोर युट्यूबर्स रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी हजर झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही त्यांचे जवाब नोंदवण्यासाठी तिथे पोहोचले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्यांची 2 तास चौकशी केली, अशी माहिती मिळत येऊ. इंडियाज गॉट लेटेंट या यूट्यूब शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप अलाहाबादिया आणि चंचलानी यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी दोघांनाही समन्स पाठवलं होतं. त्यानंतर हे दोघे आज पोलिसांसमोर हजार झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष चंचलानी आणि रणवीर अलाहाबादिया यांनी मुंबई सायबर सेलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दोघांनीही अधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांना त्यांचे जबाब नोंदवायचे आहेत. या प्रकरणात, समय रैना, अपूर्व मुखिजा आणि शोशी संबंधित इतर सर्व व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबई सायबर सेलच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या प्रकरणात अभिनेते, दिग्दर्शकासह 42 जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.