
येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये 3 व 4 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय शास्त्रंग मार्शल आर्ट्स स्पर्धेत मुंबई जिह्याने दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंनी तब्बल 48 सुवर्ण, 13 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत प्रथम क्रमांक पटकावला.
राज्य संघटनेचे सचिव मिलिंद काटमोरे यांच्या नियोजनाखाली यशस्वीरीत्या पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून 600 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. उच्च दर्जाच्या लढती, शिस्तबद्ध आयोजन आणि खेळाडूंच्या उत्पृष्ट तंत्रामुळे स्पर्धेला मोठी रंगत आली होती.
मुंबई उपनगरातील मंगेश शिर्पे, पशुपती ठाकूर, गौरांग ठाकूर, नव्या करंजेकर, अपूर्वा मोहिते, आराध्य कानडे, आलिया आगलावे, अथर्व अणवकर, रितवी टेलर, क्रिषेल पिंटो, अन्वी राणे, सानिका चव्हाण, आराध्य राणे, सई वालावलकर, सान्वी कदम, आराध्य वालावलकर, शिवांश राणे, निकोलस मकवास, अंश राणे, मैत्री महाडिक, वंशिका कदम, श्रेयश गिरवे, शिवांश यादव, नव्या यादव, अभिनव सिंग, हर्षाली राठोड, नियांशु पेठे, भव्या मोहिते, स्वरा ननावरे, नैतिक बगालिया, मीनाक्षी राऊत, सार्थक धुले, सार्थक भरडावा, अथर्व भुवड, तन्मय मलुस्ता या खेळाडूंनी उत्पृष्ट कामगिरी करत मुंबईच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
खेळाडूंना मुंबई जिल्हा अध्यक्ष पशुपती ठाकूर, सचिव मंगेश शिर्पे, तसेच प्रशिक्षक गौरांग ठाकूर, अखिलेश राणे, हर्ष राणे आणि अपूर्वा मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध सरावामुळे आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळेच मुंबईचा संघ स्पर्धेत अव्वल ठरला, अशी भावना उपस्थित क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.































































