वीज वाहिनीच्या संपर्कात आल्याने वडाळ्यात तरुण भाजला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टाटा पॉवरची मानखुर्द-परळ दरम्यान 110 केव्हीची उच्च दाब वीज वाहिनी आहे. वडाळा गणेश नगर येथे रात्री दीडच्या सुमारास सोनू नासीर शेख (23) हा तरुण वीज वाहिनीच्या संपर्कात आल्याने गंभीररीत्या भाजला आहे. त्याला उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे केलेल्या बांधकामामुळे हा तरुण वीज वाहिनीच्या संपर्कात येऊन अपघात झाल्याचे टाटा पॉवरने स्पष्ट केले आहे. दरम्यान उच्च दाब वीज वाहिन्यांच्या संपर्कात येऊन अपघात होईल, अशी कोणतीही कृती नागरिकांनी करू नये, असे आवाहन कंपनीने केले आहे.