कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘एक्सई’चा देशात शिरकाव; मुंबईत पहिला रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱया लाटेपासून निर्बंधमुक्त झाल्यामुळे देशभरातील व्यवहार सुरळीत सुरू असतानाच पुन्हा चिंता वाढवणारी बातमी आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने देशात शिरकाव केला आहे. ओमायक्रॉनची नवी आवृत्ती असलेला ‘एक्सई’ या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण मुंबईत आढळला आहे. ओमायक्रॉनपेक्षा 10 टक्के वेगाने संसर्ग पसरण्याचा धोका ‘एक्सई’ व्हेरिएंटमध्ये आहे. तसेच, ‘काप्पा’ व्हेरिएंटचे लक्षणे असलेलाही एक रुग्ण मुंबईत आढळला आहे.

देशातील ‘एक्सई’ व्हेरिएंटचा संसर्ग झालेली महिला दक्षिण आफ्रिकेतून आली होती. कोरोना संसर्ग झाला होता. विदेशातून आलेल्या 230 जणांचे नमुने जिनोम सीक्वेन्सिंग चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील एकामध्ये ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरिएंट ‘एक्सई’चे लक्षणे आढळली. ‘एक्सई’ व्हेरिएंट आढळलेली महिला रुग्ण आहे. तर आणखी एका रुग्णात ‘काप्पा’ व्हेरिएंटची लक्षणे आढळली आहेत.

‘एक्सई’ व्हेरिएंटचे ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्ण
n ‘एक्सई’ हा ओमायक्रॉनचे सबव्हेरिएंट बीए-1 आणि बीए-2 याचा रिकॉम्बिनेंट स्ट्रेन आहे. बीए-2च्या तुलनेत दहापट वेगाने जास्त फैलावतो.
n ब्रिटनमध्ये 19 जानेवारीला ‘एक्सई’ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला होता. सध्या ब्रिटनमध्ये 600 वर रुग्ण आहेत. त्यानंतर थायलंड, न्यूझीलंडमध्येही या व्हेरिएंटने शिरकाव केला. n जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला ‘एक्सई’ हे नाव दिले आहे. अनेक देशांनी या नवीन व्हेरिएंटपासून सावध राहावे, असा इशारा दिला आहे.