मुंबई फाल्कन्स उपांत्य फेरीत

मुंबई फाल्कन्स संघाने तिसऱया टी- ट्वेंटी मुंबई लीगच्या उपांत्य फेरीत धडक मारली. विजयाच्या हॅटट्रिकमुळे त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित झाले होते. चौथ्या सामन्यात त्यांनी ईगल ठाणे स्ट्रायकर्सकडून झाला तरी त्यांच्या बाद फेरीतील स्थानावर काहीच फरक पडला नाही. या सामन्यानंतर उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले.

सांघिक अष्टपैलू कामगिरी आणि अमित पांडेने मुंबई फाल्कन्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करताना टिपलेला अप्रतिम झेल हे स्ट्रायकर्सच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. परिणामी, फाल्कन्स संघ यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पराभूत झाला. स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 151 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल फाल्कन्सचा डाव 16 व्या षटकात 115 धावांवर आटोपला. सलामीवीर अंगक्रिष रघुवंशी लवकर बाद झाला तरी तिसऱया क्रमांकावर फलंदाजी करणाऱया इशान मुलचंदानी आणि श्रेयसने फाल्कन्सला झटपट सुरुवात दिली. अथर्व अंकोलेकरच्या डावखुऱया फिरकी गोलंदाजीवर मुलचंदानीही परतला तरी स्ट्रायकर्सनी चांगली धावगती कायम ठेवली होती.