चौपाट्या विसर्जनासाठी सज्ज!

अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळणार असून निर्किघ्नपणे विसर्जन सोहळा पार पाडण्यासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी कंबर कसली आहे.

गिरगावसह मुंबईतील चौपाट्यांवर सध्या जय्यत तयारी करण्यात येत आहे. या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लाकण्यात आले आहेत.

विसर्जन मार्ग सज्ज झाले आहेत. ठिकठिकाणी टेहळणी मनोरे उभारले असून महत्त्काच्या सूचना देणारे फलकही जागोजागी लावले आहेत.

विसर्जन मार्ग आणि चौपाट्यांवर पोलिसांचाही मोठा फोजफाटा तैनात करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे.