
मुंबई महानगरपालिकेत गेल्या दीड वर्षापासून प्रशासकांच्या कारभारात असलेल्या आरोग्य यंत्रणेची दुर्दशा झाली असून रुग्णालयेच अत्यवस्थ असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अधिकाऱयांच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना औषधे मिळत नसल्याने त्यांना बाहेरून खरेदीसाठी आर्थिक भुर्दंड पडत आहे. गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘आपला दवाखाना’मध्ये काही ठिकाणी औषधे आहेत, पण डॉक्टर पिंवा कर्मचारी नाहीत, अशी स्थिती असल्याने पालिकेने तातडीने याची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची तरतूद करण्यात येते. पण सद्यस्थितीत रुग्णालयात औषधे मिळत नाहीत. डॉक्टर, कर्मचारीवर्ग अपुरा आहे. आयसीयू बेडची कमतरता आहे. अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत नेलेल्या गोरगरीब रुग्णाला कधीच आयसीयू बेड मिळत नाही. औषधे बाहेरून आणण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडतो. केईएमसारख्या रुग्णालयाने तर आपल्याच जागेत मेडिकलसाठी भाडय़ाने जागा दिल्याने गोरगरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोपही पर्ह्ट येथील काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अश्रफ आझमी, मोहसीन हैदर, सुफियान वनू, डॉ. अजंता यादव, डॉ. प्रियतमा सावंत, पुरण दोशी, शीतल म्हात्रे, रफीक झकेरिया आदी उपस्थित होते.
प्रशासकाच्या ढिलाईमुळे निविदा रखडल्या
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य, जीवनरक्षक औषधे, दूध आणि अन्नपुरवठा यांच्या निविदा प्रक्रिया प्रशासकांच्या ढिलाईमुळे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत. याचा फटका लाखो मुंबईकर रुग्णांना बसत असल्याची टीकाही या वेळी करण्यात आली. प्रत्येक रुग्णालय वेगवेगळे दर आणि अटींवर समान वस्तू खरेदी करत आहेत. ही खरेदी चढय़ा दराने होत असल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. प्रशासकाच्या मंजुरीनंतर पेंद्रीय खरेदी प्राधिकरणाकडून बेकायदेशीर निविदा रद्द केल्या जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. 1500 कोटींच्या प्रिस्क्रिप्शनलेस योजनाही बोगस असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.





























































