पॅरोलची रजा हवी असल्यास पोलीस ताफ्याचे पैसे द्यावे लागतील; कोर्टाची अबू सालेमला ताकीद

पॅरोलची रजा हवी असल्यास सोबत राहणाऱ्या पोलीस ताफ्याचे पैसे द्यावे लागतील, अशी स्पष्ट ताकीद उच्च न्यायालयाने बुधवारी गँगस्टर अबू सालेमला दिली.

सालेमच्या भावाचे निधन झाले आहे. त्याला कुटुंबाला भेटण्यासाठी आझमगडला जायचे आहे. यासाठी त्याने पॅरोल रजेची विनंती केली. नाशिक कारागृह प्रशासनाने ही सुट्टी नाकारली. त्याविरोधात सालेमने न्यायालयाचे दार ठोठावले. न्या. अजय गडकरी व न्या. शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

चार दिवसांची रजा सालेमला मिळू शकेल. मात्र या दिवसांत त्याच्या सोबत असणाऱ्या पोलीस ताफ्याचे पैसे सालेमला द्यावे लागतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र गेली अनेक वर्षे सालेम कारागृहात आहे. तो पोलीस ताफ्याचे पैसे देऊ शकत नाही, असे सालेमच्या वकील फरहाना शहा यांनी न्यायालयाला सांगितले. पोलीस ताफ्याचे पैसे सालेम देणार की नाही, याची माहिती सोमवारी होणाऱ्या सुनावणीत द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.

त्याच्या भावाचे निधन झालेय

सालेमच्या 14 दिवसांच्या पॅरोल रजेला सीबीआयने विरोध केला. यावर न्यायालय संतप्त झाले. त्याच्या भावाचे निधन झाले आहे हे लक्षात ठेवा, असे न्यायालयाने सीबीआयला फटकारले.

Pay for Police Escort if You Want Parole: Mumbai HC to Abu Salem

The Mumbai High Court told gangster Abu Salem that he must pay for the police escort if he wants 4 days of parole to visit family in Azamgarh after his brother’s death.