आयटीआयमध्ये यंदा 54 हजार प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यातील आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला यंदा अल्प प्रतिसाद मिळत आहे. प्रवेश मिळाल्यानंतरही खूपच कमी विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. आतापर्यंत झालेल्या तीन प्रवेश फेऱयांनंतर 53 हजार 886 जागांवर प्रवेश झाले असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा 15 ते 20 टक्के प्रवेश कमी झाले आहेत.

राज्यातील आयटीआयची प्रवेश प्रक्रिया व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत आहे. यंदा कोरोना आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाल्याने प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. मराठा आरक्षणाचा पेच सुटल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यातील 358 तालुक्यांत 417 शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची प्रवेश क्षमता 92 हजार 556 इतकी आहे. याचबरोबर राज्यात 569 खासगी आयटीआय असून त्यांची प्रवेश क्षमता 53 हजार 272 आहे. शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये 1 लाख 45 हजार 828 जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या आतापर्यंत तीन फेऱया पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये एकूण 53 हजार 886 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

आतापर्यंत झालेले प्रवेश

  • पहिली फेरी – 88,060 विद्यार्थ्यांपैकी केवळ 30 टक्केच म्हणजेच 26 हजार 881 जणांनीच प्रवेश घेतले.
  • दुसरी फेरी – 72, 733 विद्यार्थ्यांपैकी 13 हजार 673 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले.
  • तिसरी फेरी – 63, 820 विद्यार्थ्यांपैकी 13 हजार 332 प्रवेश झाले. या फेरीतही केवळ 20 टक्केच प्रवेश झाले.
    (गेल्या वर्षी सर्व फेऱयांअंती 1 लाख 20 हजार प्रवेश झाले आहेत.)