
सकाळीच मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. कल्याण ते सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक 10 ते 15 मिनिटांनी धावत आहेत. सकाळी 6.55 मिनिटांच्या सुमारास सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल 5-10 मिनिटे थांबून होती. ही लोकल का थांबली होती याचे कारण कळालेले नाही. काल रात्रभर मुंबई आणि उपनगरात पाऊस पडत होता. त्यामुळे तांत्रिक कारणामुळे लोकल उशिरा धावत असल्याचे सांगितले जात आहे.