सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत, पीक अवर्सला नोकरदारांची प्रचंड गैरसोय

 रेल्वेवरील लोकलसेवा शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी रडतखडत धावली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणाऱया लोकल ट्रेनना 30 ते 35 मिनिटांचा विलंब झाला. त्यामुळे नोकरदारांची गैरसोय झाली. रेल्वे प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराविरुद्ध प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

पावसाळय़ात मध्य रेल्वेची वाहतूक अनेकदा विस्कळीत होते. मात्र मागील काही दिवस पावसाचा जोर कमी असतानाही मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचे वेळापत्रक बिघडले आहे. बहुतांश लोकल ट्रेन 15 मिनिटांपासून 35 मिनिटांपर्यंत विलंबाने धावत आहेत. कल्याण स्थानकांपुढील प्रवाशांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचा संपूर्ण लोकल सेवेवर परिणाम होत आहे. प्रशासनाने लोकल सेवेचे वेळापत्रक न सुधारल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, अशी संतप्त प्र्रतिक्रिया वासिंद येथील प्रवासी आकाश काsंडलेकर यांनी दिली.