मानखुर्द-वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या 25 ते 30 मिनिटांपासून लोकलसेवा रखडल्याने सकाळच्या सुमारास कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. रेल्वे स्थानकांमध्ये एकामागोमाग एक लोकल उभ्या राहिल्याने अनेक प्रवाशांनी पायी जाण्यात धन्यता मानली.
ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती मिळताच मध्य रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरू असून लोकल सेवा लवकरात लवकर पूर्वपदावर करण्याचे आव्हान मध्य रेल्वेपुढे आहे.
दरम्यान, एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. ओव्हरहेड वायारचे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल आपल्या गंतव्यस्थानी रवाना झाल्या.
View this post on Instagram