मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

कॅनरा बँकेच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियम कर्ज घोटाळ्या प्रकरणी मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने हिरे व्यापारी मेहुल चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. सुमारे 55 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केल्याचा चोक्सीवर आरोप आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सी हा प्रमुख आरोपी असून 12 एप्रिल रोजी त्याला बेल्जियम येथून अटक करण्यात आली. पॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी बेझेल ज्वेलरीला एका कन्सोर्टियम करारांतर्गत कार्यरत भांडवल सुविधा म्हणून अनुक्रमे 30 कोटी आणि 25 कोटी रुपये मंजूर केले होते. सोने व हिऱ्यांनी जडलेल्या दागिन्यांच्या निर्मिती आणि विक्रीसाठी हे कर्ज देण्यात आले होते, मात्र कंपनीने त्याचा वापर अन्य कारणांसाठी केला, असे सीबीआयचे म्हणणे आहे.