राज्यात कोरोनाच्या 12 हजार नव्या केसेस, 390 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात एकाच दिवसात 12,248 नवीन कोविड केस आढळल्या असून एकूण केसेसची संख्या आता 5 लाख 15 हजार 332 इतकी झाली आहे. तर 390 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची आकडेवारी रविवारी राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केली आहे.

कालच एकाच दिवशी सर्वाधिक 12,822 कोरोनाच्या पॉझिटीव्हच्या केसेसची नोंद झाल्यानंतर रविवारी 12,248 पॉझिटीव्ह केस महाराष्ट्रात सापडल्या आहेत.आज एकाच दिवसात 390 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या 17,757 इतकी झाली असल्याचे आरोग्य अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. याच वेळी 13,348 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 3 लाख 51 हजार 710 इतकी झाली आहे. आता राज्यात एकूण 1 लाख 45 हजार 558 इतक्या ऍक्टीव्ह केसेस असून शनिवारी हा आकडा 1 लाख 47 हजार 048 इतका होता. पुण्यात आज 1,433 नवीन केस सापडल्या असून 58 जणांचा 24 तासांत मृत्यू झाला आहे.

मुंबईत आज 1,066 नवे रुग्ण, 48 जणांचा मृत्यू

मुंबईत रविवारी कोरोनाचे 1066 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 48 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,232 जण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 96 हजार 586 वर पोहोचली आहे. मुंबईत 48 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6,796 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहोचला आहे.