मालाडमध्ये क्रिकेटपटूची गळफास लावून आत्महत्या

430

मालाडमध्ये राहणाऱया उदयोन्मुख क्रिकेटपटूने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. करण राधेश्याम तिवारी असे त्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्की त्याने बहिणीला आणि मित्रांना सोशल मीडियाकर व्हाॅइस मेसेज पाठवले आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली.

करण हा मालाडच्या सहयोग नगरमध्ये कुटुंबियांसोबत राहत होता. त्याला क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते. तो आयपीएलच्या संघातील फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करत असायचा. सोमवारी रात्री करण मित्रांसोबत बाहेर गेला होता. रात्री तो घरी आला. जेवण करून तो झोपण्यासाठी दुसऱया रूममध्ये गेला. त्याने सव्वा दहाच्या सुमारास मित्रांना आणि बहिणीला व्हाॅइस मेसेज केले.

आपण आयुष्याला कंटाळलो आहे. क्रिकेटमध्ये करिअर होत नाही. तुम्हाला सोडून जातोय, स्वत:ची काळजी घ्या असे त्याने मेसेज पाठवला. रात्री त्याच्या बहिणीने तो व्हाॅइस मेसेज पहिला. याची माहिती तिने आईला दिली. त्यानंतर करणची आई रूम मध्ये गेली. रूमचा दरवाजा आतून बंद होता. शेजारील रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा करणने गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती समजताच कुरार पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी करणच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या