विमानात बॉलिवूड अभिनेत्रीसोबत छेडछाड, आरोपीला 3 वर्ष कारावासाची शिक्षा

2458

विमानात बॉलिवूडमधील अभिनेत्रीसोबत छेडछाड केल्याप्रकरणी आरोपी विकास सचदेवा (41) याला न्यायालयाने दोषी ठरले आहे. न्यायालयाने आरोपीला पॉस्को कायदा कलम 8 आणि कलम 354 अन्वये तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह 25 हजार 500 रुपयांचा दंड भरण्याचेही आदेश दिले आहेत.

2007 मध्ये विमानात घडलेल्या या प्रकरणी बुधवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने आरोपी विकास सचदेवा याला दोषी ठरवले आणि तीन वर्षांची शिक्षा सुनावली. यावेळी आरोपीच्या वकिलाने विकास सचदेवा याच्या कमाईने त्यांचे घर चालते, तसेच तो पहिल्यांदाच दोषी आढळला आहे, त्याच्याविरोधात दुसरा कोणताही गुन्हा दाखल नाही, त्यामुळे कमीत कमी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. परंतु न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचा दावा फेटाळला. दरम्यान, आरोपी विकासकडे उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्याची संधी आहे.

काय आहे नक्की प्रकरण?
2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिल्लीवरून मुंबईला येत असताना विकास सचदेवा याने विमानात तिच्यासोबत छेडछाड केली. त्यावेळी ती अल्पवयीन होती. या घटनेनंतर धक्का बसलेल्या अभिनेत्रीने विमानातील क्र्यू मेंबरकडे याची तक्रार केली, मात्र कोणीही मदत केली नाही असा दावा तिने केला. मुंबई पोहोचल्यानंतर अभिनेत्रीने लाईव्ह व्हिडीओ करून याची माहिती दिली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. यानंतर अभिनेत्रीने पोलिसांमध्ये एफआयआरही दाखल केली. यानंतर गेल्याच वर्षी या अभिनेत्रीने चित्रपट कारकीर्दीतून संन्यासही घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या