लंडनमध्ये वंशद्वेशातून मराठी माणसाचे घर पेटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mac-karlekar-house-fire

सामना ऑनलाईन । लंडन

परदेशात राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना वंशद्वेशाचा सामना करावा लागत आहे. लंडनमध्ये मयुर कार्लेकर या मराठी माणसाचे घर वंशद्वेशातून जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.15 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कार्लेकर, त्यांची पत्नी आणि मुलगी झोपलेले असताना त्यांचे घर पेटवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र या आगीत कार्लेकर यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, आग लावतानाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱॅमध्ये कैद झाली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणी तेथील सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. मयुर कार्लेकर हे मुळचे डोंबिवलीचे असून 1999 पासून ते इंग्लंडमध्ये राहत आहेत.