मुंबईत मराठीसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत केवळ मराठीसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह करच उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज दिली. सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील 65 चित्रपट आणि कोविड काळातील 98 चित्रपटांना एकूण 24 कोटी 10 लाख अर्थसहाय्य वितरित करण्यात आले. त्या वेळी आशीष शेलार यांनी ही घोषणा केली.