मुंबई मराठी पत्रकार संघ दिवाळी अंक स्पर्धा

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने 23 वी राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात मोठय़ा बक्षीस रकमेची राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आहे. मुंबईसह रायगड जिह्यातील लेखक, कवी, व्यंगचित्रकार यांना संधी देण्यात आली आहे.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक रुपये एक लाख व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक 50 हजार, तृतीय पारितोषिक 30 हजार अशी भरघोस रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कथेसाठी 7 हजार रुपये, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट व्यंगचित्र, उत्कृष्ट विशेषांक व उत्कृष्ट मुखपृष्ठ यांना प्रत्येकी 5 हजार रुपये त्याचबरोबर बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकाला 7500 रुपये अशी पारितोषिके आहेत तसेच रायगड जिह्यातून प्रसिद्ध होणाऱया दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकाला 40 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला 20 हजार आणि तृतीय क्रमांकाला 10 हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी 5 हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱया संपादक, प्रकाशकांनी दिवाळी अंकाच्या दोन प्रती व प्रवेश शुल्क 100 रुपये रोख, धनादेश अथवा डीडीद्वारे 10 डिसेंबरपर्यंत अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी केले आहे.

अंक पाठवण्याचा पत्ता अध्यक्ष/कार्यवाह, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान, महापालिका मार्ग, सीएसटीएम, मुंबई – 400001. संपर्क- 022-22620451/22700715.