
मुंबईची मोनोडार्लिंग असलेल्या मोनोरेलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या मोनोरेलच्या 118 फेऱ्या सुरू आहेत. यात 24 फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मोनोरेलची एकूण संख्या 142 झाली आहे. त्यामुळे आता दर 18 मिनिटांनी धावणारी मोनोरेल दर 15 मिनिटांनी धावणार आहे. त्यामुळे मोनोरेलच्या प्रवाशांचा वेटिंग टाईम कमी झाला आहे.
मोनोरेलचा प्रवास झाला आणखी जलद आणि सुखकर!
प्रवाशांच्या सेवेसाठी एक अतिरिक्त मोनोरल धावणार असून मोनोची सेवा १८ मिनिटांऐवजी दर १५ मिनिटांनी धावेल, आधीच्या ११८ फेऱ्यांमध्ये २४ फेऱ्यांची वाढ करण्यात आली असून आता एकूण १४२ फेऱ्या झाल्या आहेत#MMRDA #Monorail #MumbaiMonorail pic.twitter.com/tx12cCWNqd— Mumbai Monorail (@monorail_mumbai) November 9, 2023




























































