
मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात आला असून दररोज अडीच हजारांवर चाचण्या होत असताना एक आकडी रुग्णसंख्या नोंद होत आहे. तर सद्यस्थितीत केवळ 12 रुग्ण आहेत. त्यामुळे लवकरच टप्प्याटप्प्याने कोरोना चाचण्या बंद करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सजीव कुमार यांनी दिली. मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तीन भयंकर लाटा पालिका आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे परतवून लावण्यात यश आले. सद्यस्थितीत कोरोनामुळे होणारे मृत्यूही थांबले असून बाधित आढळण्याचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे चाचण्या टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

























































