मेट्रो 4-5 साठी ठाणे येथे संयुक्त स्थानक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी। मुंबई

ठाणे ते कल्याण ही मेट्रो-4 आणि वडाळा ते कासारवडवली मेट्रो-5 या मेट्रो रेल्वेच्या दोन्ही लाईन्सना ठाणे येथे संयुक्त स्थानक बनवण्याची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) योजना आहे. तसे डिझाईनही एमएमआरडीएने बनवले आहे.

कासारवडवली हे या स्थानकापासून फक्त 500 मीटरवर असल्याने संयुक्त स्थानक झाल्यास प्रवाशांचा वेळही वाचणार आहे आणि एमएमआरडीएचा 20 कोटी खर्च वाचणार आहे. मेट्रो-5 च्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. ऍफकॉन्स, लार्सन ऍन्ड टूब्रो आणि एनसीसी या कंपन्यांकडून निविदा आल्या आहेत. पुढील दोन महिन्यात त्या उघडल्या जाणार आहेत. 24 किलोमीटरच्या मेट्रो-5 मार्गावर 17 स्थानके आहेत. 2021 पर्यंत या मार्गावर 2 लाख 30 हजार प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.