दहिसरची अदिती परब ‘टीआयजीपी मिस इंडिया’

दहिसरच्या अदिती परब हिने टीआयजीपी मिस इंडिया 2025 हा किताब पटकावला. नवी मुंबईतील आयटीसी फॉर्च्यून हॉटेल, वाशी येथे द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टचा (टीआयजीपी) ग्रॅण्ड फिनाले नुकताच पार पडला. यामध्ये अदितीने देशभरातील स्पर्धकांना मागे टाकत पुरस्कारावर नाव कोरले. त्याचबरोबर तिने ग्लॅमरस फेस हा विशेष उपविजेते पदाचा मानदेखील मिळवला.

कृष्णा आणि कृतिका परब यांची लेक अदिती हिला लहानपणापासूनच नृत्य, अभिनय आणि कला क्षेत्राची आवड आहे. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि जिद्दीमुळेच आज ती स्थानिक मंचांपासून थेट राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. टीआयजीपी हे डॉ. स्वरूप पुराणिक यांच्या संकल्पनेतील आणि सीईओ डॉ. अक्षता प्रभू यांच्या नेतृत्वाखालील व्यासपीठ आहे. या सोहळय़ाला बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानी परीक्षक म्हणून उपस्थित होत्या.