
सोन्याची तस्करीप्रकरणी बांगलादेशी नागरिकासह विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सीमा शुल्क विभागाने अटक केली. त्याच्याकडून 1590 ग्रॅम सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 2 कोटी 15 लाख रुपये इतकी आहे.
विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी सीमा शुल्क विभागाने घेतली आहे. शनिवारी एका खासगी विमानाने बांगलादेशी नागरिक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने त्याच्यावर नजर ठेवली. त्याने सोन्याची भुकटी असलेली चार अंडाकृती पाकिटे विमानतळावरील कर्मचाऱ्याला देत असताना पकडले. सीमा शुल्क विभागाने ती सोन्याची भुकटी असलेली चार पाकिटे जप्त केली.
























































