
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय)ने ऑपरेशन गोल्डन स्वीप हाती घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर कारवाई करून सोन्याच्या तस्करीचे सिंडिकेट उद्ध्वस्त केले. देशात सोने तस्करी करणाऱ्याविरोधात कारवाई हाती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी डीआरआयने कारवाई करून 12 कोटी 58 लाखांचे सोने जप्त केले होते. ही घटना ताजी असताना आज डीआरआयने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धडक कारवाई केली. डीआरआयने कारवाई करून 4 किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 4 कोटी 64 इतकी आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.