
ताडदेवच्या वेलिंग्टन ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला पालिकेच्या अग्निशमन विभागाने एनओसी दिली असून टॉवरचे बांधकाम अधिकृत करण्याबाबतच्या अर्जावर विचार केला जात आहे, अशी माहिती पालिकेने आज हायकोर्टात दिली. ताडदेव येथील वेलिंग्टन ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 34 मजली इमारतीला फक्त 16 मजल्यापर्यंत ओसी मिळाली असून उर्वरित 17 ते 34 मजले ओसीव्यतिरिक्त तसेच संपूर्ण इमारतीला फायर एनओसी नसल्याचे उघडकीस आले होते.




























































