गिरगावमध्ये मजुराची हत्या

व्ही.पी. रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानामध्ये काम करणाऱ्या एका मजुराने दुसऱ्या मजुराची निर्घृण हत्या केल्याची घटना आज घडली. गिरगावच्या 7वी खेतवाडी येथील तळ अधिक एक अशी एकाच मालकाची दुकाने असून एक मजूर खालच्या तर दुसरा मजूर वरच्या मजल्यावर काम करत होता. शिवाय दोघेही जण वरच्या दुकानात राहत होते असे समजते. दरम्यान आज सकाळी एक मजूर त्या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.