
एका गुह्यात आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता बेजबाबदार काम केल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. गेल्या महिन्यात एक गुन्हा दाखल केला होता. त्या गुह्यात संबंधिताला अटक करण्याची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. ही बाब समोर आल्यानंतर त्याचा ठपका ठेवत वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.