शिवडीत ई-सिगारेटचा अड्डा उद्ध्वस्त

आरोग्यास हानिकारक असल्याने शासनाने बंदी घातलेली असतानाही ई-सिगारेटचा मोठ्या प्रमाणात साठा करणाऱ्याना शिवडी पोलिसांनी दणका दिला. पोलिसांनी फॉसबेरी मार्गावरील एक्सेल ट्रेडिंग कंपनी येथे छापा टाकून साठा केलेले तब्बल 30 लाख 50 हजार किंमतीचे ई-सिगारेटचे 305 बॉक्स जप्त केले. फॉसबेरी मार्गावरील महेंद्र पानवाल्याजवळ एक्सेल ट्रेडिंग कंपनी येथे ई-सिगारेटचा साठा करून ठेवला असल्याची खबर शिवडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त विजय सागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवडी पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून पैजल जवेरी याला पोलिसांनी अटक केली.