
शिवसेना शिव आरोग्य सेना व वर्ल्ड वाईड ह्यूमन राइट्स ए.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई महापालिकेत आपत्कालीन विभागात काम करणाऱ्या आरोग्यसेविका व चतुर्थ श्रेणी महिला कर्मचाऱ्यांचा परळ येथे सत्कार करण्यात आला.
आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड वाईड ह्यूमन राइट्स ए.एफ.चे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत व किडवाई पोलीस ठाण्याचे सीनियर पीआय विजय तावडे यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य सेनेचे सरचिटणीस, डब्ल्यूएचआरएएफचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र सकपाळ, महाराष्ट्र अध्यक्ष मोहन वायदंडे, शिव आरोग्य सेनेचे सरचिटणीस अमोल वंजारे, मुंबई सचिव ज्योती भोसले, मुंबई सहसमन्वयक प्रकाश वाणी, शिवाजी झोरे, अॅड. प्रवीण दबडे, विजय रायममाने, विनोद वायदंडे, ज्योती राणे, नितीन कोलगे, नितीन पन्हाळकर, अमोल बोरकर, अनंत कोटकर, अमित लोट, विकास भोसले, विनायक कानसकर, नंदकुमार बागवे, संदेश कोटेकर, अक्षया चव्हाण, सारिका कोळंबकर, चंद्रकांत हळदणकर, विनायक जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील मुंबई पब्लिक स्कूल येथे कॉम्प्युटर सेट, साउंड सिस्टम तसेच शैक्षणिक साहित्याची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेचे स्थानिक आमदार अनंत (बाळा) नर यांनी आयडीबीआयच्या सीएसआर फंडातून हे साहित्य शाळेला उपलब्ध करून दिले. या साहित्याचे वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका पाटील, शाखाप्रमुख मंदार मोरे, अविनाश रासम, अक्षय नर यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या सचिवपदी मंजिरी देशपांडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा देताना म्युनिसिपल बँकेचे माजी संचालक व सिनेट सदस्य प्रदीप सावंत, आशीष पाटील, गुरुनाथ साटम.





























































