
सुवर्णलता वांगे यांनी दादरच्या श्री छत्रपती शिवाजी मंदिर येथे ‘श्रावण क्वीन स्पर्धा 2025’चे आयोजन केले होते. स्पर्धेत मंगळागौरीत खेळल्या जाणाऱया खेळांचा समावेश होता. महिलांसाठी दोन गटात भरवलेल्या या स्पर्धांना संपूर्ण महाराष्ट्रातून महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत चुरशीच्या लढतीत सिद्धी संतोष झगडे यांना सेपंड रनर अपचे पारितोषिक मिळाले. याकरिता त्यांना स्वर स्वामी कला साधनाचे संचालक गणेश हातगे, प्रियांका हातगे, सौरभ हातगे, राजेश हुनारी यांचे फार मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धा प्रमुख म्हणून सुवर्णा भागवत यांनी तसेच वैशंपायन गमरे, शेखर दाते, केदार वांगे, प्रशांत पवार यांनी व्यवस्थापनाचे काम पाहिले.