Mumbai News – पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड, लोकल सेवा कोलमडली; गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीराने

पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरी स्थानकात मंगळवारी सायंकाळी तांत्रिक बिघाड झाला. यामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अंधेरी स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कामावरून घरी परतणारे चाकरमानी रेल्वे स्थानकात अडकले आहेत. लोकल 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत आहेत. बोरीवलीकडे जाणाऱ्या लोकलही उशीराने धावत आहेत.