
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवेचे वेळापत्रक मंगळवारी पूर्णपणे विस्कळीत झाले. कांदिवली येथील कारशेडच्या कामाचा लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. दिवसभरात 102 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या ‘पीक अवर्स’ला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी 102 लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेने जाहीर केले.

























































