
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेल्याने त्याची पाच वाहनांशी जोरदार टक्कर झाली. या कंटेनरने दिलेल्या धडकेत एका गाडीतील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या कंटेनरने मारूती डिझायर गाडी क्रमांक एमएच 48 ए 6512 या गाडीला धडक दिली. या गाडीतील चालक आणि एका महिला प्रवाश्याचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील दोन महिला जखमी झाल्या. त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला नसला तरी पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक मंद गतीन सुरू आहे.


























































