
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी सकाळी एक अजगर आल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या पाईपलाईन खालून हा अजगर रस्त्यावर आल्याने येथे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वाहतुक विस्कळीत झाल्याने घटनास्थळी पोलिसही दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी संजय गांधी नॅशनल पार्कमधून सर्प मित्राला बोलावून अजगराला पकडून नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आलं.






























































