
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने आता प्रस्तावित 16 रेल्वे स्थानकांपैकी चार स्थानकांना नवा लूक देण्याच्या कामाला गती दिली आहे. त्यात पश्चिम रेल्वेवरील कांदिवली, मीरा रोड तसेच मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ, कसारा या स्थानकांचा समावेश आहे. डिसेंबर 2025 पर्यंत चारही स्थानकांमध्ये प्रशस्त एलिव्हेटेड डेक, जागोजागी लिफ्ट आणि एस्केलेटरची सुविधा उपलब्ध करण्याचे एमआरव्हीसीचे उद्दिष्ट आहे.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अर्थात एमयूटीपी-3 ए अंतर्गत मुंबईतील 17 उपनगरीय रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. सर्वात आधी खार रोड स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. जवळपास एक हजार कोटींच्या खर्चाचा हा संपूर्ण प्रकल्प असून त्याअंतर्गत प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.