मुंबईत तुफान पाऊस, लोकल सेवा विस्कळीत तर कांदिवलीत दरड कोसळली

1484

मुंबईत मंगळवार, 4 आणि बुधवार, 5 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरवत पावसाने 3 ऑगस्टच्या रात्रीपासूनच कोसळायला सुरुवात केली. मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने तडतडबाजा वाजवायला सुरुवात केली. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे मुंबईमध्ये सर्व नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफची बचाव पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, मुंबईतील समुद्र किनारे, चौपाटय़ांवर जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या पावसामुळे कांदिवली इथे दरड कोसळली असून पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस आणि येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा दिलेला इशारा यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतील सगळी कार्यालये, आस्थापने बंद असतील अशी माहिती दिली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार 12 वाजून 47 मिनिटांनी समुद्रात 4.45 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती दिली आहे. या काळात कोणीही जीव धोक्यात घालू समुद्रकिनारी जाऊ नये असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या