
मुंबईतील रिअल इस्टेटसाठी सप्टेंबर महिना एकदम सुगीचा ठरला आहे. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार सप्टेंबर 2025मध्ये मुंबई शहरात 12070 मालमत्तांची नोंदणी झाली. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 32 टक्के आहे. त्याचे मुद्रांक शुल्क 1292 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, जे वार्षिक तुलनेत 47 टक्के जास्त आहे. मुंबई 2025च्या पहिल्या नऊ महिन्यांत 111939 पेक्षा जास्त मालमत्तांची खरेदी झाली. त्यामुळे राज्याच्या महसुलात 11141 कोटी रुपयांची भर पडली. नाईट फ्रँक अहवालानुसार एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना जास्त मागणी होती. 500 ते 1000 चौरस फुटांच्या घरांना पसंती दिसून आली. एकूण विक्रीच्या 81 टक्के भाग या आलिशान, प्रशस्त घरांचा आहे.





























































