महिलेची निर्घृण हत्या करणारा माथेफिरू गजाआड, पंतनगर येथील हत्येच्या गुन्ह्याची उकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतनगर येथे एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करून पसार झालेला माथेफिरू गुन्हेगार अखेर सापडला. गेले दहा दिवस पोलीस ज्याचा दिवसरात्र कसून शोध घेत होते तो आरोपी शनिवारी मानखुर्द येथे गुन्हे शाखा युनिट-5 च्या हाती लागला. आरोपीने दुसऱयांदा अशाप्रकारे महिलेची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर पंतनगर येथील भाजी मार्केटजवळच्या दोन इमारतींमधील मोकळ्या जागेत एका महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून झाला होता. मृत महिलेचे हात पाय, तोंड बांधून तिचे डोके दगडाने ठेचण्यात आले होते. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. युनिट-5 चे प्रभारी निरीक्षक घनःश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर तसेच एपीआय संजय जगताप, अमोल माळी, जयदीप जाधव व पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तसेच खबऱयांना कामाला लावले. फुटेजवरून आरोपी 35 ते 40 वयोगटातील असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याची चालण्याची लकब, वेशभूषा आदींची माहिती मिळाली. त्याआधारे युनिट-5 च्या चार पथकांनी  आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपी हा बेवारस व रस्त्यावर राहणारा असल्याने त्याला पकडणे मुश्कील काम बनले होते. पोलिसांनी अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून आरोपीचे पह्टो मिळवले. तसेच त्या पह्टोवरून गुह्यांचा अभिलेख तपासल्यावर त्या आरोपीचे नाव सागर यादव (40) असे असून तो वाशी येथील एका महिलेच्या हत्येच्या गुह्यात त्याला अटक झाली होती. तळोजा कारागृहात शिक्षा भोगून तो बाहेर आला होता.

मुंबई, नवी मुंबईतील फुटपाथवर शोध

आरोपी हा नशेबाज व फुटपाथवर राहणारा असून तो सोयीनुसार पुठेही राहत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यानुसार पोलिसांनी मुंबई, नवी मुंबईतील फुटपाथवर सागरचा शोध सुरू केला. अखेर तो मानखुर्द येथे येणार असल्याची खबर मिळताच घनःश्याम नायर, संजय जगताप, अर्चना पाटील, बंडगर व पथकांनी मानखुर्द येथे सापळा रचून त्याला पकडले.

वाशी येथे सागर यादवने एका महिलेची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली होती. पंतनगर येथेदेखील त्याने त्याचप्रमाणे महिलेला खल्लास केले होते. 2016 मध्ये त्याने वाशी येथे महिलेची हत्या केली होती. त्या गुह्यात पकडला गेल्यानंतर तो तळोजा कारागृहात होता. गेल्या महिन्याच्या सात तारखेला तो कारागृहाबाहेर आला होता. नशेबाज असलेला सागर महिलांवर अत्याचार करून तिला ठार मारतो. पुढील कारवाईसाठी सागर यादवला पंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.