
राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या सोमवारी विविध शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 11 सप्टेंबरपासून बेमुदत बंद पुकारणार असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. मुंबईच्या शाळांनी या आंदोलनात सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे मुंबईत या आंदोलनाचा प्रभाव नसेल. जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशा शिक्षकांच्या मागण्या आहेत.






























































