शिक्षकांचे रखडकलेले पगार द्यायला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील शिक्षकांचे रखडवलेले पगार वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईतील सर्व शिक्षकांचे पगार त्यांच्या खात्यात जमा होतील, असे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले.

1 जानेवारी 2019 पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाचा मार्च पेड इन एप्रिलचा पगार 8 तारीख आली तरी झाला नाही. गुढीपाडव्याचा सण शिक्षकांना पगाराविना साजरा करावा लागला. मार्च पेड इन एप्रिलचा पगार उणे बिलातून द्यावा लागतो. मात्र त्याबाबत काहीच हालचाल शिक्षण विभागाने केली नाही. पगाराची बिलेसुद्धा तब्बल 15 दिवस उशिराने ट्रेझरीकडे पाठवण्यात आली. त्यामुळे शिक्षकांचे पगार रखडले होते. पण आता लवकरच शिक्षकांच्या बँक खात्यात पगाराची रक्कम जमा होणार आहे.

रखडलेल्या पगाराच्या मुद्दय़ावर शिक्षक भारतीच्यावतीने शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली होती. यावेळी असंख्य शिक्षकही उपस्थित होते. तसेच शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाख दराडे यांनीही शिक्षकांचा पगार होण्यासाठी पाठपुरावा केला होता.