पारा 14 अंशांवर घसरला… मुंबईकर कुडकुडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
एवढ्या थंडीत शेकोटीचा मोठा आधार.

गुरुवारी पहाटे कुडकुडतच अंथरुणातून बाहेर पडलेले मुंबईकर  दुपारी आणि सायंकाळीही थंड वाऱ्यांमुळे गारठून गेले. मुंबईच्या पाऱ्याने यंदाच्या हिवाळय़ात पहिल्यांदाच गुरुवारी 14 अंशांची नीचांकी पातळी गाठली. बोरिवलीत तर सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान 12 अंशांवर घसरले. हे किमान तापमान गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी असल्याचे हवामान खात्याने सांगितले. पुढील दोन दिवस तापमान 10 ते 12 अंशांवर घसरू शकते.