मुंबई ते कोलंबो विमान भाडे साडेसहा लाखांवर, रविवारी हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि श्रीलंकेत खेळवल्या जाणाऱ्या टी-20 विश्वकपमध्ये येत्या रविवारी हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान संघ एकमेकांना भिडणार आहे. कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी मुंबई, दिल्लीहून क्रिकेटप्रेमी मोठय़ा संख्येने कोलंबोकडे जात आहेत. परंतु, विमानाचे भाडे लाखाच्या घरात पोहोचले आहे.

मुंबईहून कोलंबोला जाण्यासाठी 13 फेब्रुवारीचे नॉन स्टॉप भाडे 22,943 रुपये ते 61,993 रुपये झाले आहे. तर 1 स्टॉपसाठी 18 हजार 923 ते 4 लाख 59,605 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मुंबईहून कोलंबोला जाण्यासाठी 14 फेब्रुवारीचे नॉन स्टॉप भाडे 47,818 रुपये ते 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

14 फेब्रुवारीला 1 स्टॉप भाडे 18,503 रुपये ते 2 लाख 58 हजार 333 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दिल्लीहून कोलंबोला जाण्यासाठी 13 फेब्रुवारीला नॉन स्टॉप फ्लाईटचे भाडे 31,600 रुपयांपासून सुरू होऊन 81,032 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर 1 स्टॉपसोबत हे भाडे 19 हजार 899 रुपये सुरू होऊन 6 लाख 66 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.