
कोकण मार्गावरील लोकप्रिय गाडी असलेल्या दादर-सावंतवाडी ‘तुतारी एक्स्प्रेस’ला आता कायमस्वरूपी चार अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱया चाकरमानी जनतेला दोन जादा जनरल डब्यांतून दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे.
मध्य रेल्वेने ‘तुतारी एक्स्प्रेस’ला सणासुदीच्या दिवसांत चार अतिरिक्त डबे जोडून गर्दीच्या वेळी प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने हे डबे कायमस्वरूपी ठेवले जाणार आहेत. ट्रेन क्र. 11003/11004 दादर-सावंतवाडी ‘तुतारी एक्स्प्रेस’ला चार अतिरिक्त डबे जोडल्याने 1 वातानुकूलित 3-टीयर, 1 शयनयान श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी डबे प्रवाशांना दिलासा देणार आहेत. हे जादा डबे सोमवार, दि.11 नोव्हेंबरपासून जोडले जाणार आहेत.
गाडीला आता 19 डबे
सोलापूर-पुणे हुतात्मा आणि भुसावळ-पुणे एक्स्प्रेसला एलएचबी डबेही जोडण्यात येणार आहेत. 12157/12158 पुणे- सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस आणि 11025/11026 पुणे – भुसावळ एक्स्प्रेसच्या एका दिशेच्या गाडीला एलएचबी रेक लावला असून दुसरीही एलएचबी परिवर्तित होणार आहे. या गाडय़ा आता 19 डब्यांच्या होणार आहेत. त्यात 14 द्वितीय श्रेणीच्या चेयर कार, 1 वातानुकूलित चेयर कार, 1 शयनयान श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 जनरेटर कम ब्रेक व्हॅन अशी डब्यांची स्थिती असेल.






























































