इंजिनीयरिंगपाठोपाठ एमएससीच्या प्रश्नपत्रिकेतही घोळ; हॉलतिकीट, प्रश्नपत्रिकांवरील कोड क्रमांकात फरक

197

इंजिनीयरिंगच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नच न छापणार्‍या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आता एमएससी 2 (फिजिक्स) च्या परेक्षेतही घोळ घातला आहे. परीक्षेतील दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका चुकीच्या असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून अनेक प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरील होते असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

13 डिसेंबरला एमएससी 2 (फिजिक्स) या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार statistical mechanics आणि nuclear physics या विषयांच्या प्रश्नपत्रिकेत बरेचसे प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरील होते. तसेच हॉलतिकीट आणि प्रश्नपत्रिकांवरील कोड क्रमांकही वेगवेगळे होते असा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून या सर्व प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांना पूर्ण गुण द्या, युवासेनेची मागणी

या प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नांना पूर्ण गुण देण्यात यावेत व त्यांचे शैक्षणिक वर्ष टाळावे अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आणि प्रदीप सावंत यांनी केली. तसेच या प्रकारास जबाबदार अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांच्याकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या