मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र (हिवाळी 2024) मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. चारही विद्याशाखा अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा यात समावेश आहे. हिवाळी सत्र 2024साठी आयोजित होणाऱया या परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत तृतीय वर्ष बीकॉम, बीकॉम फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्श्युरन्स, अकाउंटिंग अँड फायनान्स आणि बीएमएस सत्र-5च्या परीक्षा या 23 ऑक्टोबरपासून आयोजित केल्या जाणार आहेत. तृतीय वर्ष बीए सत्र-5च्या परीक्षा 13 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. एलएलबी (तीन वर्षीय) सत्र-5 आणि एलएलबी (पाच वर्षीय) सत्र-9ची परीक्षा 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील तृतीय वर्ष बीएस्सी, बीएस्सी (संगणक शास्त्र), (जैवतंत्रज्ञान), (माहिती तंत्रज्ञान), (फॉरेन्सिक) आणि (डेटा सायन्स) सत्र-5च्या परीक्षा 13 नोव्हेंबरपासून सुरू होतील.