
मुंबई विद्यापीठातील नरिमन पॉईंट येथील मादाम कामा या मुलींच्या वसतिगृहात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. काही महिन्यांपूर्वी 15 दिवस खानावळ बंद होती. त्याचबरोबर वसतिगृहामध्ये जनरेटर नाही तसेच पुरेसे गिझर, वॉटर प्युरिफायर नाहीत, अग्निसुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. महिला सुरक्षाच्या खोल्यांना ग्रिल नसणे तसेच पूर्ण वेळ वॉर्डन नसल्यामुळे 126 मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या गैरसोयी दूर करून विद्यार्थिनींना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली. त्यावर अधिवेशनानंतर मिलिंद नार्वेकर यांच्यासह सहा आमदारांची समिती वसतिगृहाची पाहणी करून या गैरसोयी दूर करण्यासाठी काम करील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मुंबई विद्यापीठातील नरिमन पॉईंट येथील मादाम कामा या मुलींच्या वसतिगृहात मूलभूत सुविधा नसल्यामुळे मुलींची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. त्याचबरोबर वसतिगृहाला पूर्ण वेळ वॉर्डन नाही. ज्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्या वॉर्डन वसतिगृहात राहत नाहीत. त्यामुळे मुलींची सुरक्षा वाऱयावर आहे. याबाबत सरकारने काय उपाययोजना केली आहे तसेच सुविधा न पुरवणाऱया दोषींवर कोणती कारवाई केली, असा प्रश्न मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला. त्यावर पूर्णवेळ वॉर्डन देण्यासाठी प्रयत्न करू, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
सीएसआर फंडातूनही पैसे देऊ
गेल्या अधिवेशनाआधी कलिना पॅम्पसमधीस वसतिगृहातील गैरसोयींबद्दल पाच आमदारांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीत आता मिलिंद नार्वेकरांचाही सदस्य म्हणून समावेश करण्यात येईल. नरिमन पॉईंटबरोबर कलिनामधील वसतिगृहांतील सुविधांचा पुन्हा आढावा घेतला जाईल. दोन्ही वसतिगृहांमध्ये काय नाही त्याची यादी करू. मुलींच्या मेसची समस्या सोडवण्यासाठी तसेच इतर सर्व सोयीसुविधा देण्यासाठी विद्यापीठाचे मोठे बजेट आहे, मात्र वेळ पडल्यास सीएसआर फंडातूनही पैस देऊ, अशी माहिती पाटील यांनी दिली.
कलिना पॅम्पसचा सर्वसमावेशक विकास करणार
मुंबई विद्यापीठाच्या कलिना पॅम्पसमध्ये 600 एकरपेक्षा जास्त जागा आहे. मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी एवढी मोठी जागा आहे. त्यामुळे पॅम्पसचा सर्वसमावेशक असा विकास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या राहण्यासाठी सर्वसमावेशक विकास करू. त्याचबरोबर एक चांगला प्रस्ताव पेंद्र सरकारच्या क्रीडा खात्याकडून आला आहे. 2036 साली जे ऑलिम्पिक होईल त्यासाठी वेगवेगळय़ा राज्यात वेगवेगळय़ा स्पर्धा होणार आहेत. मुंबईतही त्यापैकी एक स्पर्धा कलिना कॅम्पसमध्ये घेण्यात येईल. त्यासाठी कलिना पॅम्पसमध्ये ज्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील त्या कायमस्वरूपी विद्यापीठाला देण्यात येतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.