
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईतील विक्रोळी भागात पार्कसाईट इथे धान्याने भरलेला ट्रक उलटल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. या ट्रकचे मागचे चाक गटारात अडकल्याने हा ट्रक उलटला आहे. अपघातामध्ये एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात



























































