
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि कला विभागात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्रदान केला जातो. सन 2015 च्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी विनायक पाठारे यांची निवड झाली आहे. 33 वा गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा 9 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता प्रभादेवी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे होणार आहे. त्यावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ओरिएंट ब्लॅकस्वान लिमिटेडमध्ये कार्यरत असलेले पाठारे 35 वर्षांहून अधिक काळ विविध संस्थांच्या सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत.
























































