खूशखबर! मुंबईकरांसाठी वर्षभराचा पाणीसाठा फुल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. सात तलावांमध्ये एकूण 1393826 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले असून हे पाणी 366 दिवसांना पुरणारे आहे. यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावामधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या 3800 दशलक्ष लिटरमधून 150 दशलक्ष लिटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. मुंबईला 31 ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलावांत मिळून 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असतो. या वर्षी तलावक्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे 4 सप्टेंबर रोजी 1393826 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा वर्षभर पुरेल इतका आहे.

4 सप्टेंबर रोजी उपलब्ध पाणीसाठा

panisatha-1